कसई गावठाणवाडीत देविदास गवस यांनी केलं हायमास्टचे लोकार्पण !

Edited by: संदीप देसाई
Published on: January 18, 2024 13:40 PM
views 91  views

दोडामार्ग : कसई गावठाणवाडी येथे प्रभाग क्रमांक ७ मध्ये  उभारण्यात आलेल्या हायमास्टचे लोकार्पण नुकतेच उपनगराध्यक्ष देविदास गवस यांच्या हस्ते करण्यात आले. 

    कसई दोडामार्ग  नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष देविदास यांच्या प्रयत्नातून या हायमास्टची नगरपंचायतने उभारणी केली असून, ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन करण्यात आले. वाढते शहरीकरण लक्षात घेऊन व प्रत्येक प्रभाग तथा वॉर्ड मध्ये हायमास्ट बसवण्यात आले आहेत. बरेच दिवसापासून कसई दोडामार्ग येथे हायमास्टची मागणी होती. ही मागणी उपनगराध्यक्ष देविदास गवस यांच्या माध्यमांतून अखेर मार्गी लागली आहे. त्यांचेच हस्ते नुकतेच श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक डॉ. संजय खडपकर ग्रामस्थ श्रीरंग गवस, सागर गवस, परशुराम गवस, मनोहर गवस, तेजस गवस, अमित गार्डी, तुषार गवस, रविकांत गवस, विश्वनाथ गवस आदी उपस्थित होते