शिरोडा समुद्रात बुडून कोल्हापूर येथील पर्यटकाचा मृत्यू

Edited by:
Published on: November 26, 2023 22:56 PM
views 1323  views

वेंगुर्ला : कोल्हापूर कागल येथील औदूत हरिभाऊ जोशी (३९) यांचा  शिरोडा वेळागर समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. 

    याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर येथून औदूत जोशी यांच्या समवेत त्यांचा मित्रपरिवार शिरोडा वेळागर समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. यावेळी औदूत जोशी हे पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले. यावेळी मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत जोशी हे पूर्ण दिसेनासे झाले होते. यानंतर सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळुन आला. मित्रपरिवाराने स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. याबाबत सिद्धार्थ मधुकर लोखंडे यांनी वेंगुर्ला पोलिसात खबर दिली.  यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस गजेंद्र भिसे करत आहेत.