कणकवलीत ज्येष्ठाची आत्महत्या

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 24, 2026 19:20 PM
views 130  views

कणकवली : कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथील राजेश दत्ताराम कांबळे (५५) यांनी येथीलच विश्वास कांबळे यांच्या राहत्या घराच्या खोलीतील खिडकीच्या ग्रीलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. राजेश सकाळच्या सुमारास घरी न दिसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. याबाबत राजेश यांचा पुतण्या रोहित उत्तम कांबळे (२९, कणकवली - सिद्धार्थनगर) यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.