
कुडाळ : आंब्रड बाजारवाडी येथील रहिवासी प्रभाकर आत्माराम तेली ( वय - ७५ ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. आब्रड बाजार तेली समाजसेवा मंडळच्या सल्लगार पदी कार्यरत होते. त्यांच्या अचानक निधनामुळे आंब्रड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.










