
कणकवली : रस्ता ओलांडत असलेल्या पादचारी महिलेला रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीची धडक बसली. कणकवली - आचरा मार्गावरील कलमठ - सुतारवाडी येथे सोमवारी रात्री १०.३० वा. सुमारास झालेल्या या अपघातात पादचारी जुमाबी हसन शिरगावकर (६५, मणचे -मुस्लिमवाडी, ता. देवगड) या मृत्युमुखी पडल्या. याबाबत दुचाकीस्वार साहिल अरुण नार्वेकर (२५, निरोप, ता. मालवण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुमाबी या आपल्या शेजारी हुसेन युसुफ साखरकर यांच्यासमवेत कलमठ येये एका नातेवाईकाकडे आल्या होत्या. रस्ता ओलांडत असताना साहिल याच्या ताब्यातील दुचाकीची जमाबी यांना धडक बसली. धडकेत गंभीर जखमी झालेल्या जुमाबी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अपघाताबाबत हुसेन यांच्या फिर्यादीनुसार साहिल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.