वाल्मिकनगर इथं गळफास घेतलेल्या युवकाचा मृत्यू

Edited by:
Published on: September 15, 2025 16:06 PM
views 196  views

मंडणगड : मेघनाथ नारायण आगरकर वय (३२) राहणार वाल्मिकीनगर तालुका मंडणगड याने १० सप्टेंबरला वाल्मिकीनगर येथील घरी गळफास लावून घेतला होता. त्याच्यावर एम.जी.एम. हॉस्पीटल कामोठे नवी मुंबई येथे अधिक उपचार सुरु असताना तो मयत झाल्याचे घोषीत करण्यात आल्याने या संदर्भात बाणकोट सागरी पोलीस स्थानकात १४ सप्टेंबरला त्याची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.