
चिपळूण : येथील दलवाई हायस्कूल मिरजोळीचे उपाध्यक्ष आणि युनिव्हर्सिटी ऑफ मद्रासमधून रबर टेक्नॉलॉजी विषयाचे अभियंता कै. विलास वसंतराव सावंत (देसाई) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ७१ वर्षांचे होते. सावंत यांचे माध्यमिक शिक्षण गावात तर उच्च माध्यमिक शिक्षण डीबीजे महाविद्यालयात झाले होते.
सुरुवातीच्या काळात त्यांनी शिवडी येथील मोदीस्टोन टायर्स येथे काम केले होते. कंपनीतील कामासह कामगारांसाठी लढणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. मुंबईतून गावी परतल्यावर त्यांनी वडिलांना शेतीकाम आणि गिरण व्यवसायात सहकार्य केले. गावी जम बसल्यावर त्यांनी काजू बागायत आणि प्रक्रिया उद्योग सुरू केला होता. शिक्षणकार्यासह गावातील सामाजिक समस्या सोडवण्यात त्यांचा सहभाग राहिला. कायद्याच्या अभ्यासातही त्यांना विशेष रुची राहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक सून आणि एक नात असा परिवार आहे.