
सिंधुदुर्गनगरी : मूळ वालावल गावचे सुपुत्र परंतु सध्या दत्तनगर कुडाळ येथील रहिवासी केशव गं. भागवत (८५) (भागवत सर )यांचे बेंगलोर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. वालावल येथील न. अ. शी. दे. विद्यालयाचे ते निवृत्त मुख्याध्यापक होते. अध्यापना दरम्यान मुलांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अनेक प्रयोग शाळेत राबवले. शिक्षण पद्धती सोपी करुन मुलांना शिक्षण सहज करणे यामुळे ते विध्यार्थी वर्गात लोकप्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते.वालावल गावचे सरपंच पदही त्यांनी भूषविले. वालावल गावच्या विकासामध्ये त्यावेळी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि मिळेल तिथून आपले छंद जोपासणे हा त्यांचा हातखंडा होता. आरती या प्रसिद्ध मासिकसाठी सुद्धा त्यांनी काम केलं. गेले 4 महिने प्रकृती साथ देत नसाल्याने ते मुलगा अनिश यांच्याकडे बेंगलोर येथे वास्तव्यास होते. तेथेच त्यांचे 27 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा सून, 2 मुली जावई आणि नातवंड असा परिवार आहे.