सावंतवाडी : येथील विजय कमलाकांत सापळे (वय 80) यांचे गुरुवारी निधन झाले.त्यांचे मुळ गाव वेंगुर्ला असून व्यवसाय निमित्ताने गेली 40 वर्षे सावंतवाडी येथे वास्तव्यास होते.
सबनीसवाडा सावंतवाडी येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. चित्रा सापळे, पुतण्या राकेश सापळे, सुन सौ.श्रीशा सापळे, 4 विवाहित पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मारुती, अशोक, सुहास, व प्रदीप पोकळे आणि रेखा पोकळे यांचे ते भावोजी होत. बांबोळी गोवा येथे विजय सापळे यांचे देहदान करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी सौ. रेखा,पुतणी डॉ. योजना मोरजकर सापळे तसेच नातेवाईक प्रसाद ,प्रणिल ,सनी,व सागर पोकळे बंधू सावंतवाडी व पुतण्या राकेश सापळे, सौ. श्रीशा सापळे मावस बंधू बाळ बोर्डेकर आदी उपस्थित होते.