व्यापारी महेश नार्वेकर यांचं निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 08, 2025 11:17 AM
views 510  views

कणकवली : कणकवली शहरातील रहिवासी व सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष महेश चंद्रकांत नार्वेकर (४४) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

नार्वेकर यांना गुरुवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने ते स्वतःच कणकवलीतील एका खाजगी रुग्णालयात गेले. पुढे उपचारनंतर ते घरी आले. शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र,  डॉक्टरांनी तपासणी केली असता महेश यांचे उपचारापूर्वीच निधन झाले होते. महेश नार्वेकर हे मनमिळाऊ व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. शहरातील सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेह‌मी सक्रिय सहभाग असायचा. सदा हसतमुख व मोठा मित्रपरिवार असलेले व्यापारी अशी त्यांची ओळख होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ते खंदे समर्थक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, बहीण, पुणते, पुतण्या असा परिवार आहे. कणकवलीचे माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, प. पू. भालचंद्र महाराज संस्थानाचे खजिनदार दादा नार्वेकर यांचे बंधू होत.