
वैभववाडी : खांबाळे चव्हाटेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दिपक महादेव पवार ( वय - ६२ ) यांचे शुक्रवारी (ता.१) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर खांबाळे स्मशानभुमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. गावच्या धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. ते श्री. देवी आदिष्टी देवस्थान समितीचे सदस्य होते. सहकारी सेवा सोसायटीचे देखील ते सदस्य होते. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ, भावजय, पुतण्या असा मोठा परिवार आहे.