जगी ज्यास कोणी नाही...

Edited by: लवू परब
Published on: July 28, 2025 13:15 PM
views 306  views

दोडामार्ग : समाजात आपले काही तरी ऋण असावे या उद्देशाने समाजात वावरत असताना राजकारणाबरोबर समाजकार्य करणारे दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते राजू प्रसादी व समीर रेडकर यांनी पुन्हा एकदा सामजिक बांधिलकी जपली आहे. एका बेवारस महिलेच्या मृत्युं नंतर सर्व विधी करून स्वतः दहन करत एक वेगळा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे.   

दोडामार्ग सावंतवाडा येथे राहणारी अपर्णा चिपळूणकर ही महिला आपल्या बहिणी सोबत एका रूम मध्ये राहत होती. रविवारी सायंकाळी तिचे निधन झाले. त्या मृत महिलेचे कोणीही नातेवाईक नसल्याने तिला दहन कोण करणार हा प्रश्न तिच्या बहिणीला पडला. त्या नंतर तिच्या बहिणीने सामाजिक कार्यकर्ते राजू प्रसादी व समीर रेडकर यांना निरोप दिला. सायंकाळची वेळ असल्यामुळे दहन करणे शक्य नव्हते त्यामुळे प्रसादि व रेडकर यांनी सदर मृत व्यक्तीचा मृतदेह दोडामार्ग ग्रामीण रुग्णालंय येथे ठेवला.

सोमवारी सकाळी राजू प्रसादी व समीर रेडकर यांनी आपल्या मित्र परिवाराला ही माहिती सांगितली. या महिलेला नगरपंचायतच्या स्मशान भूमी येथे सर्व विधी करून दहन केले. समाजकार्य करण्यासाठी मोठ्या प्रमणात युवकांनी पुढे येणे गरजेचे असल्याच त्यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी सामाजिक कार्यकर्ते मरेश गुरव, बाबू ताटे, प्रताप राऊळ, साई कुंदेकर, बळीराम सोनावणे, विनय देसाई नगरपंचायतचे कर्मचारी आदी उपस्थित होते.



फोटो