
मालवण : मनासारखे काम न मिळाल्याच्या नैराश्यातून तालुक्यातील आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथील जगन्नाथ धोंडी सडवेलकर (वय- २४) या युवकाने घराच्या परिसरात मध्यरात्री ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, पोलीस कर्मचारी अनुप हिंदळेकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पंचनामा करून मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणण्यात आला. त्याच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पेडणेकर हे करत आहेत.