
दापोली : दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील रहिवासी ए.जी.हायस्कूल दापोलीचे माजी शिक्षक उदय गोविलकर यांचे शुक्रवार, ता. ३० मे रोजी सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान, वयाच्या ७१ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. दापोली तालुक्यातील अनेक संस्थांचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून गोविलकर सर यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, मुलगा, स्नुषा, नातवंडे असा मोठा परिवार आहे.