
दोडामार्ग : सासोली हेदुस येथील अदिती आनंद सावंत ( २६ ) या युवतीचे रविवारी मुंबई येथे अल्पशा आजराने निधन झाले. अदितीने दोडामार्ग येथे शिक्षण घेतल्यावर मुंबई येथे कामाला गेली होती. आपल्या पायावर उभी राहून आपलं आयुष्य जगायच अस तीच स्वप्न होत मात्र तीच्या आयुष्याने अर्ध्यावरच पूर्ण विराम घेतल्याने तीच स्वप्न अपूर राहील. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण काका काकी असा परिवार आहे. तीच अचानक जाण्याने सासोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.