
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे वडिल रामचंद्र विठ्ठल कुलकर्णी, वय वर्षे ८२, यांचे वृद्धापकाळाने, आज सोमवार, ता.७ ऑक्टोबर रोजी, दुपारी १२.३० वाजता रत्नागिरी येथे निधन झाले. रामचंद्र कुलकर्णी हे उत्तम शेतकरी होते. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील बाणगांव हे त्यांचे मूळ गांव. उद्या मंगळवार, ता.८ ऑक्टोबर रोजी, सकाळी ८ वाजता, त्यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. रामचंद्र विठ्ठल कुलकर्णी यांच्या पश्चात मुलगा रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.