
दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी मार्गावर वायगंतड येथे बोलेरो पिकअप व दुचाकीत यांच्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. घोटगेवाडी येथील दुचाकीस्वार संतोष मधुकर शेटकर ( 52 ), व तिलारी येथील अनामिका मिंगेल सोझ ( 42 ) यांचा समावेश आहे.
शेटकर यांचा दोडामार्ग तर सोझ यांचेवर गोवा बांबोळी येथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघात प्रकरणी चारचाकी वाहन चालक आदम हुसेन नाईकवाडी ( 38 ) याच्यावर दोडामार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घोडगेवाडीवासीय याप्रकरणी आक्रमक झाले असून त्यांनी नाईकवाडी याच्यावर नुसता गुन्हा दाखल न करता त्याने माध्यपान केल्याचा आरोप करत त्यांचेवर ड्रॅंक अँड ड्राइव्ह अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती आशिकी संतोष शेटकर हे आपल्या घोटगेवाडी येथील घराकडून भेडशी बाजारपेठमध्ये जात होते. वाटेत येत असताना तिलारी येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या अनामिका मिंगल सोझ हिने शेटकर यांच्याकडे लिफ्ट मागितली असता त्यांनी लिफ्ट दिली. हे दोघे तिलारितून तिलारितून भेडशी कडे येत असता वायगंतड येथे पोहचले असता भेंडशीहुन तिलारीला जाणाऱ्या बोलेरो पीकप गाडीने त्यांना सोमरून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की दुचाकीचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. अन अपघातात शेटकर यांचं डोकं बोलेरो पीकप गाडीला जोरदार आदळले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आणि मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होऊ लागला. मागे बसलेल्या सोझ यांनाही गंभीर दुखापत झाली. तर अपघातग्रस्त बोलेरो पीकप गाडी गटारत पलटी झाली.
दरम्यान, या अपघातानंतर मोर्लेचे पोलिस पाटील तुकाराम चिरमुरे त्याठिकाणी पोहचले असता. त्यांनी अपघात ग्रस्ताना आपल्या खाजगी ओमनी कारमधून साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथून त्यांना 108 रुग्णवाहिकेने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी रुग्णवाहिका मधील डॉ दिव्या गवस यांनी गंभीर जखमी शेटकर यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यांना अपयश आले शेटकर हे मृत झाले. तर या अपघातात गंभीर जखमी झालेली अनामिका सोझ हिला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठवण्यात आले होते. तिची प्रकृती अधिक चिंताजनक होतीच. त्यांच्यावरही उपचाराचे प्रयत्न निष्फळ ठरले त्याही संध्याकाळी मृत झाल्या.