देवगड बंदरात मच्छीमारीसाठी गेलेल्या 'त्या' खलाशाचा मृत्यू

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 03, 2024 14:14 PM
views 151  views

देवगड : देवगड तालुक्यातील समुद्रात मच्छीमारीसाठी नौकेवरील खलाशी गेला असता त्या खलाशाची अचानक प्रकृती बिघडल्या मुळे त्याला उपचारासाठी देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विटकर यांनी तो मृत असल्याचे सांगितले.सदर ची घटना रविवार ३ मार्च ला ७:३० च्या दरम्यान घडली.

देवगड पोलिस सूत्रांन कडून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड समुद्रात सागर सम्राट ही मच्छीमारी नौका एक मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मच्छीमारी करण्यासाठी गेली होती. या नौकेवरील खलाशी पिंटू मधु कुलू वय २३, सध्या राहणार देवगड (मूळ राहणार घरेलूपाडा सुंदरगड ओरिसा) याच्या आज ३ मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास छातीत व पोटात दुखत असल्याने त्याला पुन्हा नौकेने देवगड बंदरात आणत असताना अचानक अस्वस्थ होऊन त्याची हालचाल बंद झाली.त्याला सकाळी साडेसात वाजता देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विटकर यांनी तो मयत असल्याचे घोषित केले.

याबाबतची फिर्याद सागर सम्राट नौकेचे मालक संतोष रविंद्र तारी यांनी देवगड पोलिसात दिली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करत आहेत.