'त्या' निराधार वृद्धाचं निधन | सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात केलं होत दाखल

Edited by: विनायक गावस
Published on: July 30, 2023 15:27 PM
views 278  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या त्या निराधार वृद्धाच आज पहाटे ७ वाजता दुःखद निधन झाल. उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरेश नारायण मेस्त्री वय ६५ असं त्या वयोवृद्धाच नाव आहे. दरम्यान, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाच शवविच्छेदन करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस पी.के.कदम यांनी दिली. तर अद्याप त्यांच्या नातेवाईकांशी कोणताही संपर्क झालेला नसून नातेवाईकांपैकी कुणीही आलेले नाही. या व्यक्तीस दोन मुलगे असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, काही संघटना व पदाधिकारी त्या वृद्धांची ओळख पटवून नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत.