
सिंधुदुर्ग : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथील वरिष्ठ लिपिकाचं अपघाती निधन झालंय. एका वाहनाने उडवल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.
कालिदास झणझणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग इथं वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. गुरुवारी सकाळी हुमरमळा येथे एका अज्ञात वाहनाने उडवल्याने अपघाती निधन झाले आहे. ते आरटीओ ऑफिस येथे कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते.