
वैभववाडी : एडगाव पवारवाडी येथील जयवंत पवार (वय५५)यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे निधन झाले.पवार हे सध्या फणसगाव येथे पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत होते.ते शांत व मनमिळावू स्वभावाचे होते.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते तालुक्यात भाई या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजया असा मोठा परिवार आहे.