
वैभववाडी : एडगाव येथील जयसिंग वासुदेव रावराणे ( वय - ७२) सध्या राहणार वसई- मुंबई यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी १३ फेब्रुवारीला रोजी निधन झाले. मृत्युनंतर त्यांच्या इच्छेनुसार नातेवाईकांनी अवयव दान केले आहेत.
रावराणे हे निस्सीम साईभक्त होते. साईपरिवार वसई यांचे ते मार्गदर्शक होते. ते वसई, विरार, पालघर, ठाणे, मुंबई येथील साई भक्तांमध्ये “राणेकाका” म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ-भावजया, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.