नाद येथील महिलेचा उष्माघाताने मृत्यू..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 11, 2024 13:48 PM
views 1025  views

देवगड : देवगड तालुक्यातील नाद-भोळेवाडी येथील जेष्ठ नागरिक स्मिता रघुनाथ पास्टे( ६५) या काजूच्या बागेत काजू वेचण्यासाठी जात असताना वाढलेल्या उष्णतेमुळे शनिवारी दुपारी उष्माघाताने पडून त्यांचा मृत्यू झाला. त्या सायंकाळी बागेत मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.