माणगाव येथील योगेश केसरकर यांचे आकस्मिक निधन

Edited by: भरत केसरकर
Published on: December 16, 2023 20:00 PM
views 519  views

कुडाळ : माणगाव कट्टावाडी येथील चंद्रशेखर उर्फ योगेश जयराम केसरकर वय-३६ यांचे आज सकाळी ९ वाजता आकस्मिक निधन झाले. कोलगाव येथील चितारी हाॅस्पीटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री दहा वाजता त्यांची तब्येत अचानक खालावल्याने कोलगाव येथील डाॅ.चितारी यांच्या दवाखान्यात अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांची तब्येत अचानक खालवली यात त्यांचे निधन झाले.
      
काहीकाळ त्यांनी माणगाव येथील बॅक ऑफ इंडिया शाखेत कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा बजावली होती. यानंतर कनेडी येथे कोल्ड्रिंकचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, काकी, विवाहित बहीण, वहिनी, पुतणे, भावोजी असा मोठा परिवार आहे. माणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश केसरकर, हाॅटेल व्यावसायिक समिर केसरकर यांचे ते भाऊ तर कनेडी येथील हॉटेल व्यावसायिक वल्लभ भोगटे यांचे मेहुणे होत. पत्रकार भरत केसरकर यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत. एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय होता. दुपारी दोन वाजता माणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी योगेश यांच्या मित्रपरिवाराने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. त्यांच्या अचानक जाण्याने केसरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माणगावमधील दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.