उद्योजक उमेश सावंत यांना मातृशोक !

Edited by: विनायक गावस
Published on: June 29, 2024 15:53 PM
views 173  views

सावंतवाडी: मूळच्या केसरी येथील आणि सध्या कोल्हापूर शहरातील आयटीआय नजीक नाळे कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या मालुताई आत्माराम सावंत (८३) यांचे शुक्रवारी २८ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

कोल्हापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर येथील मंगळवार आणि गुरुवार पेठ येथील ओंकार कम्युनिकेशन या मोबाईल शॉपीचे तथा आय एफ बी कंपनीचे  कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याचे वितरक ओंकार डिस्ट्रीब्युटरचे मालक उमेश सावंत तसेच एनसीसी विभागातील निवृत्त मुख्य लिपीक सुदेश सावंत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.