
सिंधुदुर्गनगरी : तलाठी स्तरावरील पीक पहाणी करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार तलाठी स्तरावरील पिक पाहणीची खरीप हंगामासाठी कालमर्यादा 15 नोव्हेंबर 2022 ऐवजी 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणून द्यावे,असे माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांचे कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.