मल्टिस्पेशालीटीसाठी 'डी.डी.' सावंतवाडीत..!

उपजिल्हा रुग्णालयास दिली भेट
Edited by: विनायक गावस
Published on: January 05, 2024 13:26 PM
views 534  views

सावंतवाडी : कोल्हापूर आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या कामकाजाचा आढावा घेतला. तर प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे लवकरात लवकर उभं रहावं  यासाठी आपण ही भेट दिली असल्याचं उपसंचालक डॉ. दिलीप माने म्हणाले. हॉस्पिटलचा आढावा घेत असताना कोकणसादशी त्यांनी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भातील अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आज आपण बैठक घेतली. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याशी चर्चा देखील झाली आहे. आजच्या बैठकीत मल्टिस्पेशालीटीसाठी कोणत्या अडचणी असतील तर त्यावर तोडगा काढण्यासाठीचा सुचना देखील आपण संबंधितांना दिल्या आहेत. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर व्हाव यासाठी ही भेट होती असं मत डॉ. दिलीप माने यांना व्यक्त केले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. मुरली चव्हाण यांसह उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व स्टाफ उपस्थित होते.