वैभववाडी : तिरवडे तर्फे सौंदळ येथील गजानन परशुराम इंदुलकर (माळवाडी) यांच्या घरातून दिवसा अडीच तोळ्याचे दागिने चोरीला गेले. हा प्रकार शनिवारी १फेब्रुवारीला सकाळी ११ते दु.३ वाजण्याच्या दरम्यान घडला.
इंदुलकर दांपत्य मुंबईवरुन ३डिसेंबरला गावी आले होते.शनिवारी सकाळी वाडीत गणेश जयंती कार्यक्रमास गेले होते.या दरम्यान भरदिवसा त्यांच्या घराचा दरवाजा फोडून बेडमध्ये बॅगेत ठेवलेल्या सोन्याच्या दोन तोळ्याच्या चार बांगड्या, अर्धा तोळ्याचे कानातल्या पट्या व एक हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. कार्यक्रमावरुन परतल्यानंतर इंदुलकर यांना ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी या प्रकरणी आज पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस रणजित सावंत करीत आहेत.