विरोधात लढायची इच्छा नाही, कमी सुद्धा नाही

दत्ता सामंतांचा इशारा
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 30, 2025 16:01 PM
views 358  views

कुडाळ : मित्र पक्ष भाजपा स्वबळावर लढायची भाषा करत आहेत. आम्ही कधीची अशी भाषा वापरली नाही. सर्वच पक्षात 70 ते 80 टक्के कार्यकर्ते राणे समर्थक आहेत. त्यामुळे आम्हालाही एकमेकांच्या विरोधात लढायची इच्छा नाही. आणि जर सबळावर लढायचं झालं तर आम्ही सुद्धा कमी नाही. असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिला. 


कुडाळ येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक मंत्री उदय सामंत यांच्या उपास्थितीत होत आहे. यावेळी शिवसेना आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, उपनेते संजय आग्रे, माजी आमदार राजन तेली, संजय पडते, संजू परब, विश्वास गावकर, दादा साईल, यासह अन्य उपस्थित. 


कुडाळ मालवण मतदार संघात आमदार निलेश राणे निवडून आल्यानंतर कोट्यावधी निधी आणत आहेत. ते ज्या पद्धतीने काम करत आहेत ते पाहता निलेश राणे ब्रँडवर दहा टक्के मते वाढली आहेत. दोन्ही तालुक्यात शिवसेना मजबूत आहे. आमचे सर्व कार्यकर्ते 24 तास जनेतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. या मतदार संघात शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही. ज्या पक्षात असाल त्या पक्षाचे प्रामाणिक काम असायला हवे, ही माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची शिकवण. 2024 ला मित्रपक्षाकडे तिकीट मागत होतो. निलेश राणे हे काम करत होते. निलेश राणे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही ताकद लावणार. संपूर्ण महाराष्ट्रात उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत.