
मालवण : खासदार नारायण राणे यांची भेट घेतल्यानंतर दत्ता सामंत हे मुंबईला रवांना झाले आहेत. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दत्ता सामंत गेले काही दिवस सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते. आता ऐन निवडणुकीच्या धामधूमीत सामंत यांनी कणकवलीत राणे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संतोष साटविलकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, आदी उपस्थित होते. त्यानंतर सामंत हे मुंबईला रवाना झाले आहेत.