
मालवण : गेले अनेक दिवस सक्रिय राजकारणापासून दूर असलेले कट्टर राणे समर्थक दत्ता सामंत यांनी भाजपा खासदार नारायण राणे यांची कणकवलीत भेट घेतली आहे. यावेळी निलम राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
कुडाळ मालवण मतदार संघात निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटातून महायुतीचे उमेदवार आहेत. दत्ता सामंत यांच्या राजकारणात सक्रिय होण्याने महायुतीची ताकद वाढली आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत.