हडपीड स्वामी समर्थ मठात होणार दत्तजयंती उत्सव..!

Edited by:
Published on: December 24, 2023 19:02 PM
views 72  views

देवगड : जोगेश्वरी येथील श्री स्वामी समर्थ भक्त मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड – देवगड येथे  “श्री दत्त जयंती उत्सव  २६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी सकाळ पासूनच स्वामींच्या मठामध्ये  कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणार आहे.

सकाळी ७ ते १० गणेश पूजन, पादुका पूजन, पुण्यवाचन होम हवन ९ ते ११ लघु रुद्र, ११ ते १२ पालखी, सोहळा, दुपारी  १२:१५ वाजता महाआरती, दुपारी १ ते ३ तीर्थप्रसाद, ३ ते ४ अक्कलकोट यात्रा भाग्यवंत सोडत, ४ ते ७ नामस्मरण आणि भक्तीमय कार्यक्रम, सायंकाळी ८ वाजता पंचम ग्रुप प्रस्तुत अभंग गाथा भाव भक्ती गीत सुरेल मैफिल गायक प्रसाद जाखी.  सदर कार्यक्रमास सहकुटुंब स्वामीभक्त मित्रपरिवार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नंदकुमार पेडणेकर  व संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई, श्री. स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड गाव समीती यांनी केले आहे.