नारिंग्रेत आज दत्तजयंती उत्सव

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 26, 2023 11:26 AM
views 120  views

देवगड : देवगड तालुक्यातल्या दत्त प्रासादिक मंडळ पूर्व विभाग जोगवलवाडी, नारींग्रे यांच्यावतीने उद्या २६ डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८:०० वा. अभिषेक, सद्गुरू, नामाचे हवन, महापूजा, दुपारी १२:३० वा. ते २:३० वा. महाप्रसाद, सायं. ४:३० ते ६:३० वा. किर्तन व दत्तजन्म किर्तनकार ह.भ.प. अमित धाकोजी सावंत (मुणगे सावंतवाडी), सायं. ६:३० ते ८:०० वा. दत्त पालखी सोहळा, रात्री ९:०० ते १०:०० वा. ग्रामस्थांची भजने, रात्री १०:०० वा. श्री रोहित गोंधळी प्रस्तुत श्री देव घोडेश्र्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ 'हर्षदा सत्व परीक्षा' होणार आहे. यावेळी उपस्थितीचे आवाहन श्री दत्त प्रासादिक मंडळ, नारींग्रे, श्री दत्त जयंती उत्सव मंडळ, नारिंग्रे यांनी केले आहे.