उंबर्डेचे माजी उपसरपंच दशरथ दळवी यांचं निधन !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 06, 2024 18:25 PM
views 531  views

वैभववाडी : उंबर्डे गावचे माजी उपसरपंच दशरथ दळवी (वय ६६)यांच आज (ता.६ )सकाळी आकस्मिक निधन झाले. श्री.दळवी यांचा गावच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नेहमी पुढाकार असायचा.

पाच वर्षे ग्रामपंचायत उंबर्डेच्या उपसरपंच पदाचा कारभार त्यांनी उत्तमपणे सांभाळला होता. आज सकाळी त्यांची अचानक प्रकृती खालावली.या दरम्यान त्यांच निधन झाल. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.