डॅशिंग नगरसेवक सुधीरभाई !

वाढदिवस विशेष !
Edited by: विनायक गावस
Published on: July 03, 2023 20:30 PM
views 230  views

सर्वसामान्य कार्यकर्ता, शिवसेना शाखा प्रमुख, युवक कॉंग्रेस अध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान शहराध्यक्ष, नगरसेवक ते  आरोग्य व क्रीडा सभापती. प्रत्येक पदाला न्याय देणारा डँशिंग, झुंजार सर्वसामन्यांचा हक्काचा माणूस सुधीरभाई आडिवरेकर. सर्वसामन्य कार्यकर्ता ते आरोग्य सभापती हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेला भाजपचा हा युवा चेहरा युवाईच्या गळ्यातील ताईत बनलाय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे,  माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, आम नितेश राणे यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर जनतेच्या हदयात त्यांनी स्थान निर्माण केलय. नगरसेवक म्हणून ५ वर्षांच्या या कार्यकाळात वेगळी छाप पाडली. जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांना अंगावर घेत रखडलेली काम चुटकीसरशी मार्गी लावली. नगराध्यक्षांच्या पोटनिवडणुकीत संजू परब यांचा मागे हक्काची वोट बँक म्हणून ते उभे राहिले. 


 कोरोना काळात घरात बसून न राहता, शासनाच्या मदतीची वाट न पाहता हा नेता मैदानात होता. लोकांसाठी अहोरात्र झटत होता.  यावेळी यंग ब्रिगेडची मोठी ताकद त्यांच्यासोबतीला होती अन आजही कार्यरत आहे‌‌. 

नगरसेवक म्हणून पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी केलेलं काम, जनतेला दिलेला न्याय पाहता आगामी निवडणुकीत देखील ते मोठ्या मताधिक्यान विजयी होतील हे सांगायला कुण्या ज्योतिषाची आवश्यकता नाहीय. आपलं नेतृत्व सुधीरभाईनीच करत सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान व्हावं अशी लोकभावना आहे. अशा या झुंजार नेत्याला वाढदिनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!