सिद्धेश्वर मंदिरात १६ जूनला दशावतार नाटक

Edited by: विनायक गांवस
Published on: June 14, 2025 16:45 PM
views 330  views

सावंतवाडी : सद्गगुरु दळवी आणि तळवडे ग्रामस्थ आयोजित श्री सिद्धेश्वर मंदिरात सोमवार १६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता श्री सिद्धेश्वर पारंपारीक दशावतार नाट्य मंडळ कसई दोडामार्ग यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.

यात केशव खांबल, यश जळवी, सचिन कोचरेकर, संतोष गावस, भगवान नाईक, विठ्ठल गावकर, साहिल राणे, नारायण माजीक या कलाकारांचा समावेश आहे. तसेच हार्मोनियम यशवंत चव्हाण पखवाज गीतेश कांबळी झांजवादक शुभम मसुरकर साथ देणार आहे.