लौकिकप्राप्त कलाकारांच्या अभिनयाने रंगणार दशावतार नाट्य महोत्सव

मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
Edited by: दिपेश परब
Published on: July 14, 2024 06:49 AM
views 415  views

वेंगुर्ला : शालेय शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला-भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात १८ ते २० जुलै कालावधीत दशावतार नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये एक नाट्यप्रयोग हा कंपनीचा असून इतर दोन नाट्यप्रयोग हे संयुक्त असणार आहे. त्यामुळे नाट्यरसिकांना पर्वणी निर्माण झाली आहे.

नाट्य महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरूवार दि. १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा‘ हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे.

शुक्रवार दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता आई वडिलांचा महिमा सांगणारे ‘भक्त पुंडलिक‘ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. यात महेश गवंडे, बाबा मयेकर, दत्तप्रसाद शेणई, गोट्या येरागी, बाळा कलिगण, पंढरी घाटकर, उल्हास नाईक, सुहास गावडे, बाबा कामत, गौरव शिर्के, चारूहास मांजरेकर, शेखर शेणई व प्रकाश भगत यांच्यासह संगीतसाथीदार संकेत कुडव, किसन नेमळेकर व राजू कलिगण या लौकिकप्राप्त कलाकारांचा समावेश आहे.

शनिवार दि. २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता संघर्ष आणि दर्जेदार सादरीकरणातून नामांकित आघाडीच्या युवा कलावंतांच्या संचात ‘काशी भविष्य कथन‘ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. यात मोरेश्वर सावंत, योगेश कोंडुरकर, प्रशांत मयेकर, पिट्या दळवी, गौतम केरकर, केशव खांबल, महेंद्र कुडव, सागर गांवकर, दादा केळुसकर, उदय मोर्ये, देवेश कुडव, शिवा मेस्त्री, संदेश वेंगुर्लेकर, आनंद कोरगांवकर, आकाश मोर्ये, भाई म्हानकर यांच्यासह संगीतसाथीदार पप्पू घाडीगांवकर, बाबा मेस्त्री व आकाश खानोलकर यांचा समावेश आहे.

 नाट्यरसिकांनी या दशावतारी नाटकांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर,  वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर व शहरप्रमुख उमेश येरम यांनी केले आहे.