
सावंतवाडी : येथील सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन येत्या १९ ते २१ जानेवारी या कालावधीत सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान जवळ सायंकाळी ७ वाजता करण्यात आले असून, रविवार १९ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब ,जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी ,भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ आदी उपस्थित राहणार आहेत. 19 जानेवारीला चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे ''शिवभक्त शबर'' तर 20 जानेवारीला जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ ओरोसचे ''स्वर्गातील दशावतार'' मंगळवार 21 जानेवारीला वालावलकर दशावतार नाट्य मंडळचे ''प्रचंड भैरव'' हे नाटक होणार असून नाट्यमहोत्सवाचा समारोप होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष रवींद्र मडगावकर , सचिव प्रताप परब आदींनी केले आहे.