कलंबिस्तमध्ये दशावतार नाट्य महोत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: February 21, 2025 17:40 PM
views 162  views

सावंतवाडी : कलंबिस्त येथे महाशिवरात्र निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान दशावतार नाट्य मंडळ व कलंबिस्त ग्रामस्थ, श्री लिंगेश्वर मंदिर देवस्थान गावकरी मंडळीच्यावतीने माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या सहकार्याने येत्या दशावतार नाट्य महोत्सव आयोजित केला आहे.

22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत कलंबिस्त लिंगेश्वर मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील नामवंत दशावतार नाट्य मंडळाचे नाटके होणार आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान दशावतार नाट्य मंडळ व ज्येष्ठ ग्रामस्थ रमेश सावंत यांनी केले आहे .