
सावंतवाडी : सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत अभिनय कुमार नितीन आसयेकर लिखित 'बाळूमामा ' या यशस्वी नाट्यप्रयोगानंतर नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळाच्या माध्यमातून रामभक्तीवर आधारित भव्य ट्रिकसीनयुक्त नाट्य प्रयोग 'भक्त शिरोमणी संत कबीर' रसिकांच्या भेटीला येत आहे.
भिल्लवाडी ग्रुप मळगावतर्फे १ जानेवारी रोजी रात्री ठीक ०९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मळगाव पेट्रोल पंप जवळ नाट्यप्रयोगाचा शुभारंभ प्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगात नितीन आसयेकर यांच्यासह दीप निर्गुण, देवेश कुडव, बंड्या परब, किरण नाईक, रमेश खोत, रावजी तारी, गुरु वराडकर, रुपेश माने, श्रीधर सावंत आदी कलाकार असणार आहेत. तर हार्मोनियम सिद्धेश राऊळ, पखवाज वादक प्रकाश मेस्त्री, झांजवादक कुणाल परब यांची संगीत साथ लाभणार आहे. सहाय्यक शाम नाईक व लक्ष्मीकांत गावडे ट्रिक सीन, रंगश्री ट्रिक सीन ग्रुप नेरूर, प्रकाश योजना - दिप्तेश केळुसकर,सुरेश सातार्डेकर, आबा माणगावकर हे करणार आहेत. तरी सर्व नाट्यसिकांनी या सुंदर आणि भव्य दिव्य नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा, असे आवाहन भिल्लवाडी मित्र मंडळ तसेच श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव तर्फे करण्यात आले आहे.