
दोडामार्ग : वझरे गीरोडे येथे गोवा ग्रीन प्रॉपर्टी मधील बंद बंगल्यात घुसून अज्ञात चोरट्याने ब बंगल्याची खिडकी उघडून बंगला व ऑफिस मधील कार्यान्वित असलेला एसी व दोन नव्या कोऱ्या अडीच लाखांच्या एलईडी टिव्ही चोरट्याने लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे अशी जोरदार मागणी नागरिकांतून व उद्योजकांतून होत आहे.
याबाबत लॉरेन्स पॉल डिसोजा, वय 45 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार - कँडिडा बरेट्टो, घर नं200/5 किणी कॉलनी, मुलुर, कोर्लीम, ओल्ड गोवा, राज्य गोवा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोडामार्ग पोलीस ठाण्यात भादवी कलम 380, 454, 457 प्रमाणे अज्ञात ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्रो 07.30 ते मंगळवारी सकाळी 07.00 वाजता गोवा ग्रीन, गिरोडे ता. दोडामार्ग येथे बंद बंगल्यातील खिडकीतून बंगल्यात प्रवेश करून चोरट्याने 15000/- रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा जुना वापरता एसी, सॅमसंग एलईडी 189 cm UA75CU7700 UDH/4K पॅकिंग सहित नवीन टीव्ही संच दोन ज्यांची प्रत्येकी किमंत सुमारे 133206/- रुपये असे एकूण 2,81,412/- रुपयांच्या मालाची चोरी केली आहे. याबाबत पोलीस नाईक व प्रसादी या पोलीस निरीक्षक निसर्ग ओतरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.
श्वान पथक - ठसे तज्ञ यांच्याकडून मंगळवारी तपास
दरम्यान या चोरी प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या श्वान पथकाने तसेच ठसे तज्ञांनी याप्रकरणी घटनास्थळी दाखल होत चोराचा माग घेण्याचा प्रयत्न केला. ठसे तज्ञांना खिडकीवरील चोरट्याचे ठसे मिळवण्यात यश आले आहे. मात्र आणलेल्या श्वानपथकाकडून फारसे काही हाती लागले नसल्याचे माहिती समोर येत आहे. गीरोडे गोवा ग्रीन सारख्या हायटेक बंगलो प्रॉपर्टीमध्ये अशी धाडसी चोरी झाल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. असे प्रकार पोलिसांनी बीमोड केले पाहिजेत. अन्यथा हे प्रकार सामाजिक स्वास्थ बिघडवणारे असून नागरिकांच्या मनात सुद्धा भीती निर्माण करणारे आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.