
दापोली : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे आज कृषी महाविद्यालय दापोलीच्या गिम्हवणे येथील कृषी विद्याविभागाच्या प्रक्षेत्रातील शेतात आज अभिनव अश्या “चिखलणी रस्सी खेच स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थी तसेच कर्मचारीही सहभागी झाले होते.
आज रक्षाबंधनाची सुट्टी असल्याने हा दिवस या स्पर्धेसाठी निवडण्यात आला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक डॉ. सतीश नारखेडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद जोशी यांच्या उपस्थितीत या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेत विद्यार्थिनी, विद्यार्थी तसेच विद्यापीठातील कर्मचारी यांनी शेतातील चिखलात उतरून या स्पर्धेचा आनंद लुटला. गेली वर्षे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. हि स्पर्धा पहाण्यासाठी विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.