
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण आज, रविवार २७ जुलैला शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. उद्योगमंत्री ना. उदय सामंत, खासदार भरत गोगावले आणि गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम या सोहळ्यास प्रमुख उपस्थित होते.
साडे अकरा कोटींच्या निधीतून सुसज्ज झालेलं हे नाट्यगृह तब्बल अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा रंगकर्मी व रसिकांच्या सेवेत दाखल झालं आहे. या भव्य सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या स्फूर्तिदायक भाषणातून उपस्थितांत ऊर्जा संचारली.
रामदासभाईंचा!" अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, “हे नाट्यगृह म्हणजे केवळ लोकार्पण नव्हे, ही खेड शहराला आणि कोकणातल्या संस्कृतीला दिलेली बहुमोल भेट आहे. हे नाट्यगृह गडकरी रंगायतनसारखं वाटतं. योगेश कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे कार्य सिद्ध केलं. निधी मागताना त्यांनी मतदारसंघाच्या गरजा मांडल्या. मी ‘नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन’ घेणारा नेता आहे.”