दाणोली रस्ता खड्डेमय

मंगेश तळवणेकरांनी वेधलं सा. बां. च्या कार्यकारी अभियंत्यांचं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: November 21, 2023 19:11 PM
views 222  views

सावंतवाडी: वेंगुर्ला बेळगाव रोड कोलगाव तिठा ते बुर्डी पुल मार्गे दाणोली रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविणेबाबत माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे लक्ष वेधल आहे‌.

वेंगुर्ला बेळगाव रोड कोलगाव तिठा ते बुर्डी पुल मार्गे दाणोली हा संपुर्ण रस्ता खड्डेमय होऊन खराब झालेला आहे. सर्व वाहन चालकांना, रुग्णांना, पादचा-यांना आणि विद्यार्थी वर्गाला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. गणेश चतुर्थी, दिवाळी सर्व सण गेले. परंतु या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही होताना दिसत नाही. येत्या 15 दिवसात रस्त्यावरील खड्डे तरी त्वरीत बुजवण्यात यावेत. कारण खड्डे वाजवण्याचा प्रयत्न करणा-यांना अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अपघात होऊन जिवीत व वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. 

त्यामुळे सदरचे खड्डे 4 डिसेंबर 2023 पुर्वी बुजविण्यात आले नाही तर श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व वाहन चालक ग्रामस्थांना घेऊन 06 डिसेंबर 2023 रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषण करावे लागेल याची नोंद घ्यावी ही विनंती. आमच्या उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपलेवर राहील असा इशारा  मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.