
सावंतवाडी : नारायण राणे यांचा आम्ही आदर करतो. पण, त्यांनी बोलताना थोडा विचार करायला पाहिजे. माझ्या वडीलांना, कुटुंबाला राजकाराणात ओढू नका, त्यांचा राजकारणाशी संबंध नाही. निदान गोडबोल्या केसरकरांसाठी माझ्यावर बोलू नका असे मत महाविका आघाडीचे (उबाठा शिवसेना )उमेदवार राजन तेली यांनी व्यक्त केले. तसेच जर माझ्या किंवा परिवाराच्या, कार्यकर्त्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार विधान करणारे असतील असंही सांगितलं. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, मागच्यावेळी देखील ऍफिडेव्हीट केली होती. जर ते चालत असेल तर ते देणार किंवा नवं ऍफिडेव्हीट नाईलाजाने द्यावं लागेल. पोलीस संरक्षण मी मागणार नाही. स्वतःहून दिलं तर घेईन. कार्यकर्त्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत मी खंबीरपणे उभा राहणार आहे. मी केसरकर नाही तर राजन तेली आहे. मला कसलाही बागुलबुवा करायचा नाही. पण, ही विधान आज केसरकरांना कशी चालतात ? ही प्रवृत्ती त्यांना आता चालते का ? सत्यविजय भिसे प्रकरणात माझं नाव गुंतवायला दीपक केसरकर जबाबदार आहेत असा आरोप श्री. तेली यांनी केला.
दरम्यान, निकालानंतर राजन तेली एक नंबरला असणार. दीपक केसरकर हे तिनं नंबरवर तर विशाल परब दोन नंबरला असणार आहेत. त्यामुळे कोणी कितीही धमकावले, फोन केले, पैसे, साड्या वाटल्या तरी उपयोग होणार नाही. इथल्या जनतेनं ठरवलं आहे 'बदल हवा तर आमदार नवा' असं विधान केलं. माझ कुटुंबं कधी राणेंकडे गेल नाही. मी कार्यकर्ता म्हणून सोबत होतो. त्यामुळे कुटुंबावर बोलू नये. ज्यांनी राजकीय जीवनात खालच्या शब्दात टीका केली त्या माणसासाठी तरी माझ्यावर बोलू नये. माझं चुकत असेल तर अधिकारवाणीने सांगा. पण, केसरकरांसाठी माझ्यावर बोलू नका. नारायण राणे यांचा आम्ही आदर करतो. पण, त्यांनी बोलताना थोडा विचार करायला पाहिजे. माझ्या वडीलांना, कुटुंबाला राजकाराणात ओढू नका, त्यांचा राजकारणाशी संबंध नाही. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला सर्व दिल. तरी तुमच्यावर झालेल्या अन्यायात आम्ही सहभागी झालो. तुमच्या सावली सारखे राहीलो. आज आम्ही सोबत नाही तेव्हाच वाईट का झालो ? त्यामुळे कुटुंबावर बोलण टाळाव असं आवाहन तेलींनी केल. तर, फटके मारणार म्हणजे काय ? ज्या केसरकरांनी भाजपला दुय्यम स्थान दिले त्यासाठी तुम्ही कार्यकर्तांना मारणार? जीवाची बाजी लावून संघटना वाढवलेल्या कार्यकर्त्यांना, मताधिक्य देणाऱ्यांना आज काय वाटेल ? सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहरात अस विधान गांभीर्याने घ्याव लागेल. मनाला वेदना होणाऱ्या या गोष्टी आहेत. राणेंवर बोलणार नाही अस ठरवलेल. पण, आज बोलाव लागले, यापुढे बोलणार नाही असं तेली यांनी स्पष्ट केले. यावेळी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, रमेश गावकर आदी उपस्थित होते.