
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कडवई धामणाकवाडी येथील संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन गुरुवार ,ता. २० मार्च २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार असून लहान गट (वय १ ते १५ )- प्रथम पारितोषिक रुपये २२२२ व चषक,द्वितीय पारितोषिक रुपये १५५५ व चषक व तृतीय पारितोषिक रुपये ११११ व चषक असून प्रवेश फी १०० रुपये आहे. मोठा गट (१६ ते पुढे )- प्रथम पारितोषिक ३३३३ व चषक, द्वितीय पारितोषिक २२२२ व चषक तर तृतीय पारितोषिक ११११ व चषक असून प्रवेश फी २०० रुपये आहे. ग्रुप डान्स साठी-, प्रथम पारितोषिक रुपये ४४४४ व चषक, द्वितीय पारितोषिक रुपये ३३३३ व चषक तर तृतीय पारितोषिक रुपये २२२२ व चषक असून प्रवेश फी ३०० रुपये आहे.
ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी संयोग धामणाक - 7558668565 , दिनेश गिते - 9665488054 , निलेश धामणाक - 9096433204 , विनोद धामणाक - 9967955502 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संजय धामणाक यांनी केले आहे.