
सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'लर्न अँड ग्रो' या शृंखलेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १६ डिसेंबर रोजी नृत्याविष्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार असून तिचे स्वरूप पुढील प्रमाणे राहील.पहिला गट - नर्सरी व प्ले ग्रुप पाऊस गीतावरचे नृत्य, दुसरा गट - ज्युनियर व सिनियर केजी प्राणी किंवा पक्षी गीतावरील नृत्य, तिसरा गट - इयत्ता पहिली व दुसरी देशभक्तीपर गीतावरील नृत्य अशी आहे.
स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत.मुलांनी रेकॉर्ड गाण्यावर नृत्य करायचे असून यासाठी कोणत्याही भाषेतील गीत चालेल. सादरीकरणाचा वेळ हा प्रत्येक मुलासाठी जास्तीत जास्त तीन मिनिटे राहील.स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिक दिले जाईल.सात उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रशस्तीपत्र व सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर माहिती भरून तसेच दूरध्वनीद्वारे देखील नोंदणी करता येईल.
नाव-नोंदणीची अंतिम तारीख ९ डिसेंबर असून जास्तीत जास्त मुलांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 02363-272235 / 9422386614 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केलं आहे.