तळवडेत २१ नोव्हेंबरला खुल्या ग्रुप डान्स स्पर्धा !

Edited by: विनायक गावस
Published on: November 18, 2023 14:29 PM
views 93  views

सावंतवाडी : म्हाळाई देवी कला क्रिडा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने दिवाळीनिमित्त खुली ग्रुप डान्स व सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा २१ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता श्री म्हाळाईदेवी विद्यामंदिर शाळा नं.९ तळवडे म्हाळाईवाडी येथे होणार आहे.या ग्रुप डान्ससाठी प्रवेश फि ४०० व सोलो डान्ससाठी प्रवेश फि २०० रुपये ठेवण्यात आली आहे.

       या स्पर्धेत ग्रुप डान्ससाठी प्रथम पारितोषिक ७०००,द्वितीय ५०००,तृतीय ३०००व उत्तेजनार्थ १००० रुपये ठेवण्यात आले असून सोलो डान्ससाठी प्रथम पारितोषिक ५०००,द्वितीय ३०००,तृतीय १५००,व उत्तेजनार्थ ५०० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे महेश लोके ९५५२०४६३८७ व संजय आचरेकर,सुशांत गावडे कृष्णकांत मालवणकर,श्याम हरमलकर