वेंगुर्ल्यात वादळी वाऱ्यासहित झालेल्या पावसामुळे सुमारे ८ लाखांची नुकसानी

Edited by: दिपेश परब
Published on: May 25, 2024 14:00 PM
views 242  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात २२ मे ते २४ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी घरावर झाडे पडून, वीज पडल्याने विद्युत उपकरणे जळून व बागायतींचे नुकसान होऊन सुमारे ८ लाख रुपयांची नुकसानी झाल्याची महिती वेंगुर्ला आपत्ती विभागामार्फत देण्यात आली आहे. 

या वादळी वाऱ्यासहित झालेल्या पावसामुळे वायगणी कोंडुरा येथील नामदेव शांताराम मुणनकर यांची ४० काजूची झाडे व १ माड पडून २० हजार रुपयांचे नुकसान, वायगणी येथील सत्वशिला परब यांच्या घराची कौले उडून १० हजार रुपयांचे नुकसान, शेळपी येथील रामकृष्ण अच्युत परब यांच्या मांगरावर झाड पडून १० हजार रुपयांचे नुकसान, शेळपी येथील रामचंद्र देऊ परब यांच्या मांगरावर फणसाचे झाड पडल्याने १५ हजार रुपयांचे नुकसान, वायंगणी येथील दिपक कावले यांच्या घराचे छप्पर उडून गेल्याने २५ हजार रुपयांचे नुकसान,  वांयगणी येथील अरुण धुरी यांच्या घराचे छप्पर उडून गेल्याने २२ हजार रुपयांचे नुकसान, कर्ली येथील हेमलता बाळकृष्ण गोवेकर यांच्या घरावर झाड पडून १२ हजार रुपयांचे नुकसान, खवणे येथील अंकुश लक्ष्मण परब यांच्या घराशेजारी वीज पडून २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

तसेच भेंडमळा येथील नंदकिशोर मधुकर नवार यांच्या घरावर झाड पडून १५ हजार रुपयांचे नुकसान, भेंडमळा येथील मालिनी मधुकर नवार यांच्या घरावर भेंडीचे झाड पडून १० हजार रुपयांचे नुकसान, वडखोल येथील अच्युत गुंडू नाईक यांच्या घरावर जांभळाचे झाड पडून सुमारे १८ हजार रुपयांचे नुकसान, वायंगणी येथील दिपक विठ्ठल खडपकर यांच्या घरावर माड पडून ४० हजार रुपयांचे नुकसान, वायंगणी येथील अशोक लवू कामत यांच्या घरावर झाड पडून ५० हजार रुपयांचे नुकसान, वायगणी येथील गंगाबाई चिंतामणी मुणनकर यांच्या मांगराचे पत्रे उडून १० हजार रुपयांचे नुकसान, दाभोली येथील सदानंद नारायण दाभोलकर यांच्या घरावर माडाचे झाड पडून १६ हजार रुपयांचे नुकसान, परबवाडा येथील अवधूत विष्णू परब यांच्या मांगरावर नारळाचे झाड पडून पत्र्याचे ३५ हजार रुपयांचे नुकसान, होडावडा येथील रामचंद्र मधुकर चव्हाण यांच्या घरावर काजूचे झाड पडून १० हजार रुपयांचे नुकसान, अणसुर येथील विजय जगन्नाथ गावडे यांच्या मांगरावर आंब्याचे झाड पडून ४० हजार रुपयांचे नुकसान, अणसुर येथील महेंद्र गावडे घरावर आंब्याचे झाड पडून १० हजार रुपयांचे नुकसान, हरीचरणगिरी येथील दत्तात्रय अशोक मठकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून १५ हजार रुपयांचे नुकसान, खवणे येथील राजन मधुकर खोत यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून १६ हजार ३०० रुपयांचे नुकसान, खवणे येथील गिरजा ज्ञानदेव खोत यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून १४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. 

तसेच खवणे येथील अंकुश लक्ष्मण परब यांच्या घरावर वीज पडून इलेक्ट्रिक सामान, मीटर , फॅन ,फ्रिज, मिक्सर इत्यादी साहित्य मिळून सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर केळुस येथील देवकी लिंगोजी केळुस्कर यांच्या घरावर शिवनीचे झाड पडून सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान, दाभोली येथील विजय गोविंद हळदणकर यांच्या घराच्या पडविवर आंब्याचे झाड पडून सुमारे ८८ हजार रुपयांचे नुकसान, कालवी येथील काशिनाथ रघुनाथ घारे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून ३० हजार रुपयांचे नुकसान, परुळे येथील कृष्णा यशवंत पाटकर यांच्या घरावर माडाचे झाड पडून ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच हरीचरणगिरी येथील दत्तात्रय अशोक मठकर यांचे ७ माड, २ पोफळी पडून १० हजार रुपयांचे नुकसान,  केळुस येथील सुरेश यशवंत नागवेकर यांची नारळाची झाडे पडून १५ हजार रुपयांचे नुकसान. केळुस येथील तुकाराम कृष्णा नार्वेकर यांची नारळाची झाडे पडून २० हजार रुपयांचे नुकसान तर मातोंड येथील सुशीला कृष्णा मयेकर यांच्या शौचालयाच्या टाकीवर तसेच घराचा कोनवासा व कौले फुटून सुमारे ३० हजारांचे झाले आहे. याबाबत वेंगुर्ला तहसील आपत्ती विभागाकडून माहिती देण्यात आली असून याव्यतिरिक्त कोणाचीही नुकसानी झाल्यास आपल्या गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.