
वैभववाडी : नापणे कोकाटेवाडी येथील अंजली अनंत खाडये या वृद्ध महिलेच्या राहत्या घरावर झाड कोसळले.यात घराचे मोठे नुकसान झाले आहे. खाडये ह्या शेजारच्या घरी गेलेल्या असल्याने त्या यातून बचावल्या.हा प्रकार शुक्रवारी (ता.२०) सायंकाळी साडेपाच वाजता घडला.
श्रीमती. खाडे यांच नापणे कोकाटेवाडी येथे घर आहे.या घरात त्या एकट्याच राहतात.दरम्यान शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी असलेल जुनाट झाड उन्मळून त्यांच्या घरांवर पडल.यात घरांच्या छप्पराच मोठं नुकसान झालं.घरांच छप्पर कोसळल्याने संपूर्ण घरात पावसाच पाणी आले.त्यामुळे घरातील वस्तूही भिजल्या.सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी खाडये ह्या शेजाऱ्यांकडे गेल्या होत्या.त्यामुळे त्या या अपघातातून बचावल्या.मात्र घराच्या छपराच्या झालेल्या नुकसानीमुळे सध्या त्यांच्या निवा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे.घटनेची माहिती मिळताच तलाठी श्री. कडुलकर यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.